पान:बाळमित्र भाग २.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करनकरी स्वभावाचे वर्णन. ९५ हा मी आतां धांवत धांवत बागांत जाते. मनी बागाकडे धांवत धांवत गेली. बागांत पोहच- ल्यावर श्वासोश्वास टाकतांगकतां स्वस्थ होण्यास तिला एक घटकाभर उगीच बसावे लागले, नंतर हा- नांत सुई घेऊन शिवं लगली. तों धांवल्यामुळे जो तिच्या हातां पायांस कंप झाला होता त्याचे योगानें तिला टांका देखील मारवेना; शेवटीं आणखी घटकाभर बसून जेव्हां स्वस्थ झाली तेव्हां मग शिवू लागली. शि- वतां शिवतां ते काम अधिकच वाढत चालले असे ति- ला दिसूं लागले, इतक्यांत तिची आई तेथे आली. जना०- एथें फार चांगले शिवणे होत असेल, झा. ली का कांचोळी तयार : मनी०- नाही, अझून झाली नाही. पण दिवस चारच घटका राहिला असें नाहीं, अझून पुष्कळ आहे. जना- तुझें खरेंच आहे पण, तिसरे प्रहरचा चवघडा वाजून गेला. मनी- अझून कांहीं चवघडा वाजला नाही, माझे कान तिकडेसच आहेत. जना०- तर मला कसा ऐकू आला कोण जाणे तु. झ्या मावशीनेही ऐकिला असावा; ती नवे लुगडे नेसून जावयास निघाली आहे, हे तूं आतां पा. हशील. मनी- आई, तूं मला उगीच भिववितीस; इतक्यांत कोठली जावयाला ती.