पान:बाळमित्र भाग २.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. जना- तुला सारेच खोटे वाटते. पहा ती आंगावर दागीने घालून शालजोडी पांघरते आहे; ह्या पहा तुझ्या बहिणी आल्या व भाऊ आले. मनी- अहाग आई, आतां कसें करूं, असें पण कसे झाले ९ भाऊ- (आंत येऊन ह्मणतो.) मनुबाई, मनुबाई च. लचल लवकर, मावशी तुजसाठी खोळंबली आहे. मनी- बाबा, अंमळसा दम खा एक क्षणभर. भाऊ- अगे तिसरे प्रहरचा चवघडा तर वाजून गेला; मावशीने जेवते वेळेस सांगितलें नाहीं की चवघडा वाजतांच जावयाचे ह्मणून : चार घटिका दिवस राहतां तिला माघारें आले पाहिजे, कारण की रामराव भाऊची बायको भेटीला येणार आहे. जना-कां, पाहिलें, मने १ मी तुला मघापासून हेच सांगतेना १ मनी- तर मग आतां कसें करूं आई. (मनीच्या तिघी बहिणी आंत येऊन मोठ्याने हाका मारि- तात.) चलचल, लवकर ये. मनी- होहो, पण इतकी उतावळी कां मांडली आहे। भाऊ- काय मने, कांचोळी अझून तयार नाहीं ९ ही पहा, मी आपले चुलत बहिणीला कशी कुंची घे. तली आहे ती. पहिलीबहीण- मी, पहा, तिला जरीकांठी फडकी द्यावयाला घेतली आहे.