पान:बाळमित्र भाग २.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करनकरी स्वभावाचे वर्णन. ९७ दुसरीबहीण- मी तिला खेळावया करितां मुरती बाहुल्यांचा जोड घेतला आहे. (मावशी आंत येते.) मावशी- मने, ठाऊक नाही तुला मी केव्हां जाणार ती : मी कधी कोणाचा खोळंबा करीत नाही, आणि कोणासाठी खोळंबणारही नाहीं; तुला लवकर यावयाचे असले तर ये, नाही तर बैस घरी. मनी- मावशी, अंमळ थांब, आतां थोडे राहिले आहे माझें शिवणे. मावशी०- (सर्व मुलांस बाहेर चला ह्मणते.) बरें तर मने, आह्मी जातों आतां, तूं बैस शिवीत; तुला का- म आहे ह्मणून आझी तेथे सांगू, (सर्व बाहेर नि- घून जातात.) मनी०- (रडकुंडे तोंड करून ह्मणते.) आतां काय करूं? फार दिवस माझे मनांत होते की, मी आपले बहिणीस सर्वीपेक्षा चांगली देणगी देईन, तें आज सारे व्यर्थ गेलें; मी अवघ्यांमध्ये मोठी असून घरी राहिले, तर मला आतां काय ह्मणतील १ जना०- मला तुझी दया येते खरी, पण तूं माझें कुठे ऐकतेस १ तूं अगोदर परकराचा चीण शिवून मग कांचोळीचे नादी लागतीस, तर इतके कशाला हो- तें. मावशी चार घटका दिवस राहतां जाणार हे जर मनांत न आणतीस, आणि इकडे येण्यांत दोन घटका व्यर्थ न घालवितीस, तर आतां तुला ताड