पान:बाळमित्र भाग २.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करनकरी स्वभावाचे वर्णन. ९९ स्वभाव तुझ्या मावशीला आवडला नाही, ह्मणून ती तुला टाकून गेली; पण आतां माझें ऐक; तिकडे जाण्यांत जे तुला सुख मिळावयाचें तें इकडे राहि- ल्यानेच अक्षयी मिळेल, अशी कांहीं युक्ति सांगते. मनी०- ती कोणती, आई १ जना० अगे, युक्ति हीच की, आजपासून तूं हा वाईट स्वभाव टाकून दे, आपल्याच हेक्याने वागत जाऊं नको; आई बापांचे काही ऐकत जा, कांकी त्यांना तुजपेक्षा अधिक समजतें; ह्यांत तुझें कल्याण आहे, आणि त्यांच्या सांगीप्रमाणे वागावयास काही फा रसे अवघड नाही; तूं शहाणी आहेस ह्मणून तुला सांगते. मनी०- बरें आई, मी आजपासून तुझ्याच शिकवणी. प्रमाणे वर्तेन. जना०- फार चांगले आहे; सोमवारापावेतों हा तु- झा करनकरी स्वभाव सुटला, ह्मणजे तुला मी आ- पले बरोबर तुझे काकीकडे नेईन; परकर व कां- चोळी तुजकडून तुझ्या बहिणीस नेसवीन; तेव्हां मग त्यांस बाटेल की, परकर कांचोळी तयार नव्ह- ती झणून पोर आली नाही. मनी०- ( गहिवरून ह्मणते. ) आहा, आई, तुझे शि- कवणीची गोष्ट मी कधी विसरणार नाही. जना- शाबास मने! माझे सांगणे तुझ्या मनांत ठस- ले एवढ्याने मलाही फारच आनंद वाटतो; तूं