पान:बाळमित्र भाग २.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. अशी उत्तम गुणाने वागशील तर तुझी जिकडे तिकडे वाहवा वाहवा होईल. दोन कुतरे. मोगऱ्या आणि गुल्या. रामजी पाटील ह्याने दोन वणजारी कुतरे बाळ- गले होते; एकाचें नांव मोगऱ्या व एकाचे नांव गुल्या. हे ( उभयतां) दोन्ही कुतरे एकदाच उपजले होते. पारील निन्य एका परळांत भाकरी घालून दोघांस बरोबरच खावयास घालीत असे, व दोघांवर सारखीच प्रीति करीत असे; परंतु थोडक्याच दिवसांनी उभयतां कुतांचे आचरण वेगवेगळाले दिसण्यांत येऊ ला. गले. मोगऱ्या फार चांगल्या गणांचा कुतरा निपजला आणि गुल्या फारच हाड निवाला. मोगऱ्याचा लाड कोणी केला असता त्याने ह. र्षाने उड्या माराव्या, व कोणी गुल्याचा लाड करूं लागले असता त्याचे दुःख नमानितां त्याने आनंदमय असावें; आणि त्या गुल्याचा लाड धनी करीत असतां सासमयीं जर कोणी मोगऱ्याचा लाड करूं लागले तर त्या द्वाडाने ते न सोसतां त्याचे आंगावर गुरकावें. कोणी शेजारी गृहस्थ आपला कुतरा बरोबर घेऊन रामजी पाटलाचे गुरवाड्यांत आला असतां मोगऱ्याने