पान:बाळमित्र भाग २.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ बाळमित्र. च जाग्यांत त्याजकडून उड्या मारवाव्या. तथापि गुल्याचा तो दुर्गण गेला नाही; मोगया. चा सत्कार त्या द्वाडाने कधीच केला नाही; मोगऱ्या जवळ आला असतां भोकल्यावांचून बापडा कधी उ. गा राहिलाच नाहीं; असें होता होतां कांहींका दिव. "सांनी मृत्यूने त्याचे गा-हाणे ऐकून त्यास नेले. हे मुलांनो, ही गोष्ट वाचन ध्यानांत आणा की, दुष्ट चालीने चालणे व दुसऱ्याचा हेवा करणे ह्याचा परिणाम चांगला होत नाही, हेव्याने व पापाचरणाने आयुष्याचा नाश मात्र होतो. अशा आचरणांत लाभा. ची जात देखील नाही, केवळ शरिरास दुःख दाटणी मात्र आहे; ह्यासाठी द्वैत भावाकडे लक्ष्य न ठेवितां सर्वत्र समान दृष्टीने आचरण करावे ह्यांत कल्याण. दाष्ट मुलगी. काय, तूं माझें ऐकत नाहीस ९ बरें, आतां ऐकतोस की नाही ? जर ऐकत नाहीस तर मी कधी तुझें तोंड पाहणार नाही; ह्याप्रमाणे उमा नामें एक दाष्ट मुलगी होती ती आपले भावास वारंवार बोलून गांजीत असे, आणि सर्वकाळ आपले वर्चस्व त्याजवर ठेवीत असे. तिचे मनांत माझा भाऊ जे काय करतो ते नीट करीत नाही, वारंवार चुकतो; तो मजप्रमाणे करीत नाही; मी यथा योग्य चालीने चालतें; सर्व लोकांनी दे.