पान:बाळमित्र भाग २.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दाष्ट मुलगी. खील माझें शाहणपणाचा कित्ता घ्यावा _भावानें कांहीं एक खेळ खेळावयाचें नांव घेतले ह्म णजे तिने त्या खेळाची अगदी हेटाळणी करून टा. कावी; मग दुसरे दिवशी तोच खेळ खेळावयास पुन्हां भावाला बोलवावें; असा तिचा हेकड स्वभाव भावाला मानणे प्राप्त झाले. एखादे वेळेस त्याने तिचे मणणे नऐकिलें तर तिने बोलबोलून त्याला पुरेपुरेसें करावें. कदाचित् भावाने त्रासून, तझें बोल0 रीतीचें नाहीं, असें झटले असतां लागलेच तिने इंगळा सारखें लाल होऊन आदळ आपटीवर यावे; मग त्याला एखादे कोपयांत जाऊन उगीच बसावे लागे. हा तिचा स्वभाव घालविण्याकरितां आईबापांनी तिला फार छडिलें, तथापि गेला नाहीं; न्यांत बापापे- क्षां आईने फारच यत्न केला; ती वारंवार तिला बोध करौ, अगे, तूं मुलीची जात, तुझ्या आंगी जर असा दाटपणा व उद्दामपणा राहील तर तुला कोणी पाय- पोसा जवळ देखील उभे राहू देणार नाही. नम्रपणाने सर्वांशी राहून मृदुभाषण बोलत जावें, सीपेक्षां आपण शाहणी, असें मानून उगीच आपले जागी आढयता आणतीस, हे फार वाईट; ह्यांत कांही चांगुलपणा ना- ही; अशी शिकवणीची गोष्ट आई सांगे, पण ती ति- च्या मनांत कधीच ठसली नाही. तिचा भाऊतर अशी तिची जाचणूक नित्य सोसतां सोसतां त्रासला; शेवीं तिजवरची प्रीति पहिल्यापेक्षा त्याची कमी होऊ ला-