पान:बाळमित्र भाग २.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ बाळमित्र. की, तो परकी गृहस्थ जसा त्या मुलीस घालून पाडून बोलला, तसे लोक आपणाला बोलतील; ह्याहून दुःख दुसरे नाही, त्यापेक्षां मरण बरें, ह्यासाठी अगोदरच वडिलांची आज्ञा मानन मुख पावावें हे चांगले पर- क्याचे बोलण्यापर्यंत वाट पाहूं नये. खोंक. काशिनाथ नामें मुलगा फार सदय, हास्यमुख, व गुणाचा होता; ज्याची वत्ति सदा आनंदित असे. फारतर काय सांगावें, पण त्याची आकृति आणि उत्तम रीति पाहून सर्व लोकांचे मनांत त्याविषयी प्रीति उत्पन्न व्हावी, इतके गुण त्याचे अंगी होते; पण त्याला एक माण वाईट खोड होती, ती हीच की, स्वल्प कारणाव- रून त्याला मनस्वी क्रोध येई. त्यामुळे त्याचे मित्र फार खेद पावत असत. एखादे वेळेस काशिनाथ आपल्या सोबत्यां संग. ती काही खेळत असतां, त्यांत जर दुसरा कोणी का- ही बोलला तर त्या मुलाला असा अतिशयित राग यावा की, त्यांने रक्तासारखे डोळे करून भुईवर हात पाय आदळावे, शेवटीं वेड्या सारखे होऊन मोठ्याने ओरडावें देखील. एके दिवशी बापाने त्यास सांगितले की, तूं आप. ले बहिणी करितां कळासूत्राचा खेळ करिव, अशी