पान:बाळमित्र भाग २.pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खोक. १०९ अपाची आज्ञा झाली त्यावरून तो मुलगा तमाशाचे विचारांत पडला असतां, आपले खोलीत फिरता फिरतां त्याविषयींचा मनसोबा आपले मनांत करीत होता; इतक्यामध्ये त्याचा जिवलग मित्र, गोविंदा, हा काही त्यास विचार विचारावयास आला. काशिनाथ तमाशाचे विचारांत निमग्न होता, ह्मणून त्याने गोविंदाकडे पाहि- ले नाही. गोविंदाने तीन चार वेळां काशिनाथ, काशि- नाथ, ह्मणून हाका मारल्या, तरी त्याने पाहिले नाही; तेव्हां जवळ जाऊन त्याचे आंगरख्याचा पदर ओढ- ला. अगोदर त्याचे चित्त श्रमामध्ये पडलेच होते, त्यां- त आंगरख्याला हिसका बसताच झटकन मागे वळला, तो त्या फिरण्याने त्याचा धक्का गोविदास लागून तो जिन्याच्या पायऱ्यांवरून गडबडत गडबडत खाली आ• ला, आणि अचेतन होऊन पडला. जिन्यांतून गडबडते. वेळेस कानशिलापाशी पायरीचा कांठ लागून खोंक पडली; तीतून भडभडां रक्त वाहूं लागले, श्वासोच्छास बंद झाले आणि डोळे पांढरे करून मृतप्राय झाला. हा अनर्थ क्या काशिनाथाने पाहतांच त्याची बोबडी वळ. ली, तोंडचे पाणी पळाले, हातपाय गळाले, आणि हा. य हाय अनर्थ झाला, असा मोठ्याने शब्द करून हं. बरडा फोडला. तो सद्गुणी सुकुमार मुलगा, आपल्या मित्रासाठी प्रसंगी प्राणही खर्चणार, त्याला आपल्या हाताने आणलेलें असें संकट प्राप्त झाले, अशी गोष्ट