पान:बाळमित्र भाग २.pdf/११८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७ बाळमित्र. आपल्याकडून घडेल ह्याची त्याला अगाही नव्हती. इतक्यांत अशी त्या मुलाची आरड ऐकताच त्या- चा बाप गलबलन धांवन आला. आणि तत्काळ त्या- ने गोविंदास उचलून त्याचे डोळ्यांस पाणी लावलें, व आंगावर शिंपडून थोडेसे तोंडांत घातले, आणि आंगा. वर थंड वारा घातला, तेणेकरून गोविंदा अंमळ सा. वध झाला; नंतर काही अवकाशाने शुद्धीवर आला, मग लागलेच वैद्यास बोलावून आणून ती जखम न्या- ला दाखविली, तेव्हां वैद्य परीक्षा करून ह्मणाला की, निभावले ह्मणून निभावलें, नाही तर अमळ गहूंभर पलीकडे जर ही जखम लागली असती, तर कानशील फुटून भलतेच झाले असते. मग औषध पाणी करून त्या गोविंदाला त्याचे घरी पोहोंचतें करून दिले. तो घरी पोहोचतो तंव त्या मुलाचे आंगांत मनस्वी ताप भरून बरळू लागला. अशी त्याची अवस्था झाली, त्यावेळेस हा काशिनाथ त्याचे पलंगा जवळून एक क्षणभर देखील इकडे तिकडे हालला नाहीं; लोकांनी त्याला उदंड सांगितले की, तं जा आतां बाहेर; पण तो कोमळ दृदयाचा मुलगा, ज्याचे अंतःकरणास गोष्ट लागली, तो तेथून नाहीच हालला. गोविंदा बरळतां बरळतां असें बोले, अरे काशि- नाथा, अरे काशिनाथा माझ्या प्राणसख्या, त्वां माझी अशी अवस्था करावी काय ? त्वां असें करावयाजोगें म्यां काय केले होते ९ कारणावांचून माझे डोक्यास