पान:बाळमित्र भाग २.pdf/११९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खोक. १११ खोक पाडली; असो, पण मला दुःख झाले हाणून तूंही दुःखित झाला असशील, हे योग्यच आहे, तथापि तूं दुःखित होऊ नको, मी तुला माफ करितों, आणि मी तुला रागें भरविलें ह्मणून तूंही माझे अपराधाची क्षमा कर; तुला उपद्रव द्यावा असे काही माझे मनांत नव्ह- ते, आणि तुझ्याही मनांत नसेल, पण होणाऱ्यासार- ख्या गोष्ण झाल्या. गोविदानें काशिनाथाचा हात धरला होता, पण तापाचे झापडीमुळे काशिनाथाकडे न पाहतां वारंवार असे बोलत असे; ते मृदुशब्द ऐकून काशिनाथाचे दुःख दुप्पट झाले. गोविंदाचे शब्द मैत्रीचे होते, परंतु ते का- शिनाथाचे दृदयास बाणांसारखे रुतले. ईश्वर कृपेंकरून त्याचा ताप शांत होऊ लाग- ला त्याकाळचा काशिनाथाचा आनंद काय वर्णावा ! आपल्या हाताने मित्राचा अपघात झाला असतां त्या अपघातापासून मित्र वांचला, असा जो का हर्ष त्या हषांचा उपभोग त्या सुकुमार मलाने मात्र घेतला. काशिनाथाचा आनंद जो गुप्त झाला होता तां गोविंदा चांगला बरा झाल्यावर पुन: प्रगट झाला. आ- पणापासून अनुचित घडलेल्या कर्माचे स्मरण धरून विचारानें क्रोध जिंकू लागला. गोविंदाला त्या अवस्थेची दुसरी कांही खूण राहिली नव्हती, पण तेवढा खोके. चा वण मात्र राहिला होता. त्या वणाकडे पाहून काशिनाथ लाजिरवाणा होई. उभयतांचा स्नेह उत्त