पान:बाळमित्र भाग २.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीतांबर. ११३ होन्या; त्यांस पाहून त्यांचे आईबापांस किती आनंद वाटत असेल ! पण ते कांहीं तुझां इतके मातबर नस- तील. मी पहा कशी ती, मला धड चिरडी नाही, व- स्ता नाहीत. असे काय मेले त्या चौघी मुलींत जावें. ह्मणून मी ह्मणतें, आई, तूं मला एक पीतांबर दे, आ. णि त्यांच्या सारिखे वेणीपासून पायांपावेतो सर्व दा- गिने माझे आंगावर घाल, आणि विरूपाटलाचे बायकोस माझी वेणी घालावयाकरितां बोलावून आण. असें त्या मुलीचे भाषण ऐकून तिची आई ह्मणते, बरे आहे; अशाने जर तुला सुख होत असले तर आतां मी तें सर्व तुला खुर्शाने देते; पण, मुली, मला असे वाटते की, हलक्या परकराने जसे तुला मुख होते तसे जड पीतांबर नेसल्याने होणार नाही; तुज जोगता पीतांबर असता तर कधीच मी तुला नेसविला असता; तुला परकर शोभतो तसा पीतांबर शोभणार नाही, आणि तुझी आवडही परकरापेक्षा त्यावर अधिक बसावया- ची नाही. सावित्री ह्मणते, आई, असेंगे कसें ह्मणतेस ? आई ह्मणते, मुली, ते तसेंच आहे. पीतांबर नेसलीस ह्मणजे समजेल. उंच वस्त्रास डाग पडतील, किंवा चो- ळवटेल, ह्मणून नित्य तुला जपत जावे लागेल, हळूच बसावें, धांवतां नये, उड्या मारतां नयेत, असे होईल, मनास येईल तेव्हां बाहेर गल्लीत खेळावयाला नजातां घरांत सारा दिवस बांधन घेतल्या सारखें उगीच बसा. वे लागेल. परकर वरचेवर धुतां येतो, तसा पीतांबर Pr