पान:बाळमित्र भाग २.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीतांबर. ११५ ख उत्पन्न झाले खरे, परंतु त्या भार करून तिला पा. ऊलभर देखील चालावयास कठीण पडू लागले, तेणें- करून तिची बाळप्रकृति नाश पावू लागली. तथापि आंगी आढयता आणून ती आरशांत आपले रूप वारं- वार पाही, पण पाहता पाहतां तिची तृप्तिच होईना, असा तिला आनंद झाला. तिचे मनांत की, आज म- जपढें रंभा ऊर्वशी तुच्छ आहेत; आज मजप्रमाणे स्व- रूपानें कोणी नाही. मग तिला वाटले की, मी आतां आपल्या मैत्रिणी पुढें मिरवेन; त्या मला पाहून आश्चर्य करितील. असें मनांत आणन त्यांस आपले आईकडून बोलावून आणिले. त्या मैत्रिणी घरी आल्यानंतर त्यां. पुढे ती मोठ्या संभ्रमाने इकडून तिकडे मिरवू लागली त्यावेळेस असे दिसून आले की, सावित्री कोणी मोठ्या श्रीमंताची मलगी, आणि वरकड केवळ दरिन्द्यांच्या पोरी, पण तें नटणे मुरडणे आणि तो आनंद शाश्वत नव्हे, त्यांचा लौकरच नाश होऊन पुढे दुःखदायक घडी घडतील, हे तिचे लक्षात आले नाही. सर्व मु- लींनी जवळचे आंबराईत जाण्याचा बेत केला; त्या वेळेस तिकडे जावयाला सर्वांचे पुढे अगोदर सावित्री आपण निघाली. सर्व मलीनी सावित्रीचे मनांतला अभिप्राय जाणला की, आमांपुढें तोऱ्याने मिरवून आह्मांस लाजवावें असें हिच्या मनांत आहे; तर काय चिंता आहे, आमीच हिला लाजवं; आणि आझांला हिनें खिन्न केले, तर आह्मी हिला खिन्न करूं. असे