पान:बाळमित्र भाग २.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. ह्मणून गांवांजवळच करवंदीच्या जाळ्या होत्या त्यां: कडे त्या मुली गेल्या, आणि आंत शिरून त्यांनी चा. गली अलगलेली करवंदें तोडून खाल्ली, व मधाचे पो- ळीतून मध काढून खाल्ला. वसंतकाळ होता ह्मणून तेथें बटमोगरा, गुलाब, सोनचांपे, इत्यादि नाना प्रकार ची फुलझाडे फुलली होती, त्यांची ती फुले तोडून त्यांनी काहींच्या माळा करून गळ्यांत घातल्या, कार ही वेणीस गुंफली, व कांहीं हुंगावयास घेतली, फुल. झाडांवरची तहेत हेची पाखरें त्यांनी धरून त्यांचा र. ग त्यांचे रूप पाहून पुन्हां सोडून द्यावी; आनंदान उड्या माराव्या अशा त्या मुली क्रीडेमध्ये निमग्न झाल्या. सावित्रीला आपल्या पीतांबराकडे आणि व. स्तांकडेसच पाहता पाहतां पुरे पुरे झाले; त्यापुढे तिला पहिले बाळपणचे खेळ तुच्छसे वाटले होते; पण त्या मुलींची क्रीडापाहून थोडक्याच वेळेने तिलाही काही क्रीडा करावयाची इच्छा झाली. तंव त्यास र्व मुली तिला ह्मणूं लागल्या, सावित्रीबाई, तुझी ह्या झाडाचे जाळीत येऊ नका, तुमचे पीतांबराचा झोळ झा• डाला आडकून एखादा फाटेल, दूरच असा. हे ऐकून तिला धरून आणल्या सारखें उगीच दूर बसावें लाग. त्यावेळेस तिची वस्त्रालंकारांवरची मर्जी जरा का मी झाली. तिच्या खेळण्यास प्रतिबंध होऊ लागला. तेथन जवळच आंबराई होती. तीजमध्ये पाडाचे आब खाली पडले आहेत, झाडांस नवी पालवी फुटली आ•