पान:बाळमित्र भाग २.pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीतांबर. हे, कोकिळा ऊंचस्वराने शब्द करिताहेत, सुंदर रवि मयूर इत्यादि नानाप्रकारचे पक्षी छायेमध्ये फळे खा. वयासाठी आले आहेत, अशा त्या रमणीय बागांत सर्व मुली गेल्या. सावित्रीही तिकडे जावयास लाग- ली तो सान्यांजणी तिला ह्मणूं लागल्या की, सावित्री, तूं इकडे येऊ नको, इकडे चिल्हाया फार आहेत, न्यांत तुझे पीतांबराचा सोगा गंतेल. असे ह्मणून त्या मुलींनी आंबराईत जाऊन पहिल्याने पाड वेवून खाल्ले, मग त्या मोठ्या आनंदाने सैरावैरा इकडे तिकडे धावू लागल्या; भुईशी लागलेल्या मोठमोठ्या आंब्यांच्या खांद्यांवर बसून वाऱ्याचे योगाने झोके घेत, आणि अति हर्षाने ओरडत; तो गलबला ऐकन सावित्रीचें मन त्या खेळाकडे वेधले. परंत पीतांबराच्या लडबडी मुळे,व दागिन्यांचे भारामुळे तिला स्वच्छंदें खेळतां ये- ईना; त्यामुळे वस्त्रालंकारेंकरून तिला जितका आनंद झाला होता तितका जाऊन पश्चात्ताप उत्पन्न झाला, आणि ती खिन्न होऊन बसली; तव्हां त्या सर्व मुलींत जी लहान मुलगी होती तिला सावित्रीविषयी दया आली, आणि जवळच फळांनी भरलेलें एक उंबराचे झाड होते ते तिने सावित्रीस दाखविले; तेव्हां ती सं- तोषयुक्त होऊन उंबरे घ्यावयास गेली, तो तिची वे. णी चिल्हारीस अडकली, झणन मोठ्याने आरोळ्या मारू लागली. मुलींनी ती आरोळी ऐकतांच त्या धां. वून आल्या, आणि पाहतात तो तिची वेणी वर गुंतून