पान:बाळमित्र भाग २.pdf/१२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीतांबर. ११९ तिथे जखडबंदी झाली होती, त्यामुळे तिला त्या शृंगा. राचा कंटाळा येऊन तिच्या मनांत आले की, हे सर्व टाकून देऊन आपला परकर नेसावा, पण ह्या मुली मजसाठी खोळंबणार नाहीत; कसे करावें ९ - मग ती तशीच टेकडीकडे धापा देत देत गेली. त्या मुली भरकन टेकडीवर चढून गेल्या, आणि त्यांनी तळ्याची मौज व बागांतल्या बंगल्याची मौज पाहिला. खालचे बाजूस वळणा वळणांनी नदी वाहत होती तिची मौज पाहून मैदानांत इतस्ततः फिरून विश्रांति केली. परंत सावित्रीला त्या पीतांबराचे व दागिन्यांचे भाराने त्या टेकडीवर चढतां येईना, म. णून ती खालीच बसून राहिली; तेथें विचार करावया. स तिला पुष्कळ वेळ सांपडला; तिचे मनांत पुरते आ- ले की, मी ह्या वस्त्रालंकारांचे योगाने फार श्रम पाव. लें, आणि आजचे मुखाचे लाभास अंतरले; तर ह्यांचा कांहींच उपयोग नाहीं; आई ह्मणाली होती त्याचा प्रत्यय आला. ह्या प्रकारें मनांत विचार करते आहे तंव इतक्यांत तिच्या मैत्रिणी धांवत धांवत खाली येऊ लागल्या. जेथे सावित्री बसली होती त्यावाटेने जातां जातां तिला मोठ्याने हाका मारून ह्मणाल्या, सा. वित्री, ऊठ, ऊठ, लौकर, हा पहा, अवकाळ्या वारा आणि पाऊस आला; ऊठ लौकर, नाही तर तुझा । नवा पीतांबर भिजून त्याची घाण होईल. असें ऐक. तांच ती घाबयां घाबयां उठून कोठे अडोशास जा.