पान:बाळमित्र भाग २.pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० बाळमित्र. ऊन बसावे मणन धांवं लागली. परंत त्या पीतांबराचे यागाने तिचे जिवाची लडबड झाली, आणि तिच्या मनांत की ह्याला धक्का लाग्नये, त्यामुळे तिला धाव. तां आलें नाही. अशा लडबडीने चालत असतां तिच्या पायांतली तोरडी वारंवार टांचे खाली येई ती नीट वर सारावयास तिला क्षणोक्षणी उभे राहावे लागे; वाटेंत सागरगोटी. ची जाळी होती तींतील एक फांदी तिच्या वेणीच्या गाड्यास अडकली. ती सोडावयास तिला पाव घटका लागली; असे तिचे वाटेनें भारी हाल झाले. तिच्या मावणी घरी जाऊन पोहोचल्या. ही फारच मागे रा- हिली, तो तिला पावसानें गांठले, मग तिची अवस्था काय सांगावी! पीतांबर भिजन चिंब झाला. चिखलात पाय निसरून चारवेळ बदबदां आपटली, एकठाया तर रस्त्यांत पाणी जळबंब भरले होते, तेथे तिला वाट सापडेना, ह्मणून एके बाजनें उकिरड्यावरून जाऊ लागली, तो तेथेही पाय निसरून त्या घाणीत पडली, तेणेकरून तिचे सर्वांग दुर्गधीने भरलें; व त्या गर्दीत तिच्या पायांतली तोरडी चिखलांत कोठे निघून पडली कोण जाणे, आणि आंगावर जरीकांठी फडकी हाता ती वायाचे झपाट्याने उडून गेली; अशी तिला जन्मा- ची आठवण राहावयाजोगी तिची दुर्दशा झाली; नंतर जंव तंव घरी पोहोचली. चिखलाचे योगाने चोळी पीतांबर तिच्या आंगास लाखोट्या सारखा चिकटून