पान:बाळमित्र भाग २.pdf/१३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ बाळमित्र. परशु०- होय बाबा, मी त्याच आळीतला आहे, त्या गरदीतून मी कसा निघालों असेन ते देवाला गऊक. काळ्या- तर काय तुझ्याच घराला आग लागली ती परशु०- होय बाबा, माझ्याच. जेव्हां प्रथम आग लागली. तेव्हां मी दिवाणखान्यांत छपर पलंगावर निजलो होतो. मला गाढमूढ झोप लागली होती, आऊ आले त्यांनी मला पलंगावरून खाली ओढ. ले, आणि मोताददार आला त्याने लवकर लवकर माझ्या आंगावरची पांघरणे काढली. आणि वाटेत जाळाचा भडका झाला होता त्यामधून मला बा. हेर काढले. काळ्या- अरे, अरे, फार वाईट झालें प्रवेश २ साकराऊ, गोमाई, काळ्या आणि परशुराम. (साकराऊ घरांतून काळ्यास हाका मारिते. का- ळ्याचे चित्त परशुरामाकडे लागले आहे ह्मणून तो ऐकत नाही.) साकराऊ- (गोमाईस) कायगे, काळ्या कोठे आहे ? घरे जळतात तिकडेस घरधनी गेले आहेत, त्यांकडे तर गेला नसेलनाते आपले पराव्याचे खटपटीत लागले असतील, हा पोर तिकडे जाऊन काय क-