पान:बाळमित्र भाग २.pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरें. १२५ रील, काय जाणू. गोमाई- आई, तो काही तिकडे गेला नाही; कोणसा एक मुलगा बाहेर आला आहे त्यासंगें तो बोलतो आहे. साकराऊ- (बाहेर येऊन काळ्यास बोलते.) अरे, मी तुला किती हाका मारल्या ! तुझें मन कोणी- कडे गुंतले होते ९ ओ कां नाही दिली ? काळ्या- आई, मी काही तुझी हाक ऐकली नाही. हा बिचारा मुलगा संकटांत पडला आहे, त्या सं- गती मी बोलत होतो. साक०- कांका, त्यास काय झाले आहे ? काळ्या- थोडक्यांत चुकला, नाही तर जळून मेला असता. ह्याचें घर जळत असतां त्यांतून ह्याला लोकांनी बाहेर काढले. साक०- आय आई, मूल भ्यालें असेल, तरच अग. दी वेड्यावाणी झाले आहे. मुला, तूं त्यांतून नि. घून इकडे कसा आलास १ परश०- कसा ते काय सांगं ? तेथे जेव्हां उभे राहाव- यास जागा नाहीशी झाली, तेव्हां मी लहान अ- सतां ज्या दाईचा लळा मला भारी होता तिजकडे नेऊन पोहोचवावयास आमचे भाऊंनी मोताददारा. स सांगितले; तो मला खांद्यावर घेऊन निघाला, तों आग विझवावयाला आळीत माणसें थोडी होती झणून लोकांनी त्यास अडविले, तेव्हां मला यकून