पान:बाळमित्र भाग २.pdf/१३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ बाळमित्र. तो तिकडे गेला; मग मी एका राहिलों आणि रडू लागलों तो एके मातारीने माझा हात धरून गांवकुसाबाहेर आणले, आणि मला ह्मणाली, तू ह्या समोरच्या वाटेने चल, मग मी तिने सांगित. ल्याप्रमाणे केले आणि येथवर आलों, साक- तुझ्या दाईचें नांव काय, बाबा ? तुला आठवते? परशु०- नाहीं नाहीं, तिचें नांव मला ठाऊक नाही; पण तिच्या मुलीचें नांव गोमाई इतके मला आठवते. गोमाई०- आई हा परशराम तर नसेल ना ? साक- त्यासारखा दिसता हा. परशु०- होय होय, तोच मी. साक०- तूं का आमच्या राजाराम भाऊंचा मुलगा परशु०- होय, बाई. आतां माझी ही ओळख पटली, ही गोमाई, हा काळ्या. ( ती परस्परें भेटतात.) साक-(परशुरामास मांडीवर घेऊन त्याचे तोंड कुरवाळते, आणि नेत्रांतून आनंदाश्रु ढाळिते.) जे. व्हां तुझ्या गल्लीत आग लागली तेव्हांपासून मी तुजकरितां धांकांतच होते, बरें झालें देवाने तुला एथवर आणले, आणि मला भेटविलें; आतां मला आनंद झाला. तुमचे घरास काही धोका लागेल मणून मी त्यांना तुमचे घराकडेसच पाठविले आहे; पण गोमाई, हा परशुराम ह्मणून तुझ्या ध्यानांत कसेंगे आले गोमाई- मी त्याला पाहतांच अगोदर वळखले नाही.