पान:बाळमित्र भाग २.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. १२७ खरेंच; पण मग माझा सारा जीव त्याकडे ओढला. म्यां ह्याला पाहिल्याला फार दिवस झाले आहेत. परशु०- मी इतके दिवस काकाचे घरी होतो, तेथून नक्ता आलों. दोन तीन दिवस झाले. मी आपला तेथेंच असतो तर बरे होते. ( गहिवर आणून ) अरे देवा, आतां माझ्या आईबापांची अवस्था क. शी झाली असेल ? साक०- तुझे गल्लीत आग लागतांच मी त्यांना एथून पाठविले आहे की, त्यांनी ह्या प्रसंगी कामावर प- डावें, आणि असे त्यांचेही मनांत येऊन ते धांवन गेले आहेत; तूं कांहीं आईबापांविषयी काळजी करूं नको; ते आगीत उडी घालून त्यांस जळून देतां बाहेर काढतील, याची मला पक्की खातरी आहे. आतां तूं इतके लांब धांवत आला आहेस ह्मणून तूं भुकेला असशील, तर तोंड धुऊन कां. ही खा. काळ्या- ही पहा, रावसाहेब, कशी गव्हांची भाकर आहे ती, ही घ्या. परशु०- तूं अगोदर मला परशराम ह्मणून हाक मा- रीत होतास, आणि आतांच कां रावसाहेब ह्मणून हाक मारतोस? काळ्या- बरे तर, तसेंच का होईना परशुराम, मा. झी न्यहारी घ्या. गोमाई- अंमळ थांबा, परशराम, तुह्मांला तहानहीं