पान:बाळमित्र भाग २.pdf/१३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ बाळमित्र. लागली असेल; मी दुधाची खीर करून देते. परशु०- नाही नाही, माझे आईबाप येवढ्या संकटां- त असतां माझ्याने कसें खाववेल मी त्यांस डो. ळ्यांनी पाहीन मग काय खावयाचे असेल ते खा- ईन. आतां मी त्यांकडे जातों, आणि त्यांना भेटून येतो. साक-बाबा, तूं अंमळ धीर धर, आणि विचार कर; तू जाऊन काय आगीमध्ये उडी घालणार आहेस ? परश० - मी त्यांस आगीत सोडन आलों. मला भाऊ. नी बळेंच सटव्याचे खांद्यावर दिले, आणि त्यास धमकावून सांगितले की, जा, ह्याला येथून घेऊन. ते फार रागें भरतील ह्मणून मी भ्यालों आणि इ. कडे आलों; पण मला येथे चैन पडत नाही, आ. तां कांहीं का होईना पण त्यांचे तोंड तरी मी एकदा पाहून येतो. साक०- मी तुला जाऊ देणार नाही. तुला लागले वेड, चल मजसंगती घरांत. परश०- तुह्मांला घरदार आहे, तुह्मी जा; मला आ- तां घर नाहीं दार नाही साक- वेड्या मुला, अशी हाय हाय का घेतली : तुझें माझें घर वांटले आहे की काय ? मी तुला जसें दूध पाजिले तशी आतां भाकर खाऊं घाली- न, इतक्यास चुकणार नाही. ( परशुरामास बळेच