पान:बाळमित्र भाग २.pdf/१३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. १२९ घरांत नेते आणि काळ्यास सांगते.) खबरदार ये- थेच ऐस: जर कोठे बाहेर गेलास तर मारीन, सो- डणार नाही. ते आले झणजे मला सांग; पण घरे जळताहेत तिकडे पहावयास जाऊं नको हो; म्यां तुला बजावलें आहे, आठवण ठेव. काळ्या- (आपल्यापाशी. ) बरें बरें, माझे काय ? मी गेलों गेलों, नाही नाही. अहा, तिकडे आतां शेकावयाला आगटी भली खाशी झाली असेल. एथन चांगले दिसते. आँ! मोठा मनोरा. पडलासे वाटते ! अबब, त्याखाली तर पुष्कळ घरें दबली असतील बरे.- वाहवा ! बरीच मौज झाली ! ग. रीब बिचारें पोर ! जाऊं द्याकी, त्याचे घर जळ. ल्यामुळे माझे न्यहारीस उशीर झाला. ( गोमाई हातांत तांब्या घेऊन बाहेर येती.) बयाला माझी भारी माया; बया, त्वां मजसाठी दूध आणले अ. से वाटते. गोमाई- काय ९ तुजसाठी दूध १ नाही बाबा, परश- रामाला पाणी द्यावयाकरितां तांब्या घेऊन आले आहे; तो तर खीर किंवा लाडू कांहींच खात ना- ही; आई, आई, भाऊ, भाऊ, करीत बसला आहे, आणि ह्मणतो की, मला काही गोड खावयास न- को. माझ्या तोंडाची कोरड वळली आहे, एवढेसें पाणी मात्र गुळणा करावयास द्या झणजे झाले. म- णून मी त्याला पाणी नेऊन देते.