पान:बाळमित्र भाग २.pdf/१४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ बाळमित्र. काळ्या- हो, बाबा. त्याला आल्याला एक खिण झाला. विठोजी- होय कायरे १ देवाने बरीच किरपा केली समदी माणसें जिवंत निघाली. ( संदूक खाली ठे. वून तिजवर बसतो. (मी जरा इसांवा घेतो. काळ्या- बाबा, घरांत चलकी. विठोजी- थांबरे, जरा दम धर, मी येथे बसलो आ- हे, तूं तिला सांग की. मी आलो.( तोंडावरचा घाम पुसून मनांत ह्मणतो, ) बरे झाले मी इथून जाऊन ह्यावेळेस त्यांचे उपयोगी पडलो, जर ह्या- वेळेस गेलो नसतो तर जनाचा थुका माझे तोडा. वर पडता. प्रवेश ४. विठोजी, साकराऊ, गोमाई, आणि परशुराम. साक- (घरांतून धावून जाते, आणि त्याची पाठ रगडते. ) आज देवाने मला चडेदान दिले. विठोजी- बरें पण अगोदर परशराम कोठे आहे ? परशु०- (घाबयां घाबयां धांवत येतो.) पाटील बाबा, तुही तर एकटेच आलां, माझे आईबाप कोठे आहेत १ त्यांची काय अवस्था आहे ? विठोजी- ते शाबूद आहेत बरें; खुशाल आहेत; तू