पान:बाळमित्र भाग २.pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. प्रवेश ५, विठोजी, काळ्या, आणि गोमाई. विठोजी- वरकडांची ज्यांची घरे जळाली आहेत त्या गरिबां साठी मी धर्मशाळा झाडून सारवून ठेवितों, एथें अतां लोक फार जमा होतील, त्या आळीतले लोक भिकायावाणी जागा पहात हिंडताहेत, न्या. ची दशा पाहून मला कीव येते; त्यांना मी आप. ल्या धर्मशाळेत रहावयास जागा देईन, जसे आतां इकडेसच आहेत. काय सांगं १ कितीकांचे आंग बहिर होऊन गेलें, कितीक वेड्यासारखे इकडे ति- कडे पहातात, कितीक मातीत लोळण घेतात, अ. शी त्यांची दशा काही सांगतां पुरवत नाही. गोमाई- हाय हाय, बरे झाले, परशरामा तूं इकडे लौकर आलास, नाही तर लोकांचे पायांखाली तु- डवून गेला असतास. विठोजी- माझा गाडा आला झणजे मी मातक्यान तिकडेस जाऊन झातारे कोतारे, बायका, पोरे, जी भेटतील त्यांस गाड्यावर घालन घरी घेऊन येईन, मी गरीब जरी आहे तरी ह्या वेळेस सम- द्यांच्या उपयोगी पडेन, आणि मोठा माणूस होईन, कांकी तितके सारे माझेसे होतील. ( तो संदूक उ. चलावयासाठी खाली लवतो.) काळ्या- बाबा, मी उचलावयास हात लावू ?