पान:बाळमित्र भाग २.pdf/१४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. प्रवेश ७. परशुराम, सटव्या, गोमाई, राजाराम, रेणुकाबाई, आणि लक्ष्मी. परशु-० हा आपला सटव्या! अरे सटव्या ! सटव्या- लहानग्या धण्या, फार चांगले झाले की तूं वांचलास. परश०- मी वांचलों, पण माझी आई, बाप, बहाण ही कोठे आहेत . ती तुजबरोबर आली आहेत काय ९ सटव्या- ती मज बरोबर ९ कव्हां ९ परशु०- तूं का त्यांना मागे टाकून आलास ९ सटव्या- (मागे पाहून.) ती मागे कुठे दिसत नाहीत. परशु०- (गहिवरून.) तूं इकडे त्यांस सोधावयास आलास की काय ९ सटव्या- (संश्रांत होऊन.) हो. हो, ते इकडे आले नाहीत काय ९ इकडे आले नाहीत तर मग काय होतील ९ गोमाई- परशरामा खेरीज इकडे कोणी आले नगेलें. परशु०-(घाबरून.) अरे अरे, तर त्यांचें वर्तमान काय पुढे १ विठोजी पाटलांनी एवढावेळ गोड गोड गोष्टी सांगितल्या; तुझे सांगण्यांत तर घालमेल दिसते.