पान:बाळमित्र भाग २.pdf/१४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. १३९ सटव्या- तू घाबरा होऊं नको; माझें ऐक अगोदर; मला आग विझवावयाला लोकांनी अडविले तेव्हां पून मी लोकांचे गर्दीमधी मिळलों; मला कांहीं खबर नाहीं, घाबरूं नको; मी खरे सांगतों; मग मी त्यां- स लई हुडकलें, खिंडारांत गेलों, इकडे तिकडे फि- रलों, काही खबर लागली नाहीं; लोकांस पुसलें, त्यांनी सांगितले की आह्मांला कोठे आढळली नाहीत. परशु०- हाय हाय, अरे देवा, तर ती खचीत जळा- ली असतील. सटव्या- अझून तर लई झोरें सांगावयाचे राहिले आहे, ते ऐक; उगाच घाबरा होऊ नको. परशु०-तर तें काय आहे ? ते मला तूं सांगत नाहीस? सटव्या- तुमी लईच घाबरून जातां, मग मी झोरें काय सांगं १ परशु०- बेट्या, देवाकडे पाहून खरेच बोल. सटव्या- तर लोक असे चावळत होते की गिरस्त आपल्या बायका पोरांना घेऊन बाहेर निघाला, आण त्यांलाही वाटले की आपून वांचलों, पण बंगल्याची लई मोठी लग अवचित पडली, ती खा. ली ती समदी चेपूनशाने गेली. (हे ऐकून परशु- राम धाडकन आंग भुईवर टाकतो. आणि मूच्छित होऊन निचेष्ट पडतो.) गोमाई-- (गलबलून त्यास उचलती.) अरे, अरे, पा- णी आणा, धांवा, परशराम मरतो. 67डता.)