पान:बाळमित्र भाग २.pdf/१५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. आपून मला हुकूम देतील तर मी त्यांची थोडी शे- वा चाकरी करायला जाईन ह्मणतों. राजा.- मीही तुज बरोबर येऊन त्यांचे समाधान करितो. त्यांजवर व मजवर प्रसंग एक सारखाच आहे, तथापि माझ्या पेक्षा त्यांचा फार नाश झा- ला. आतां मला असे वाटते की, नाश व दुःख हाँ कांहींच नाहीत; उलटे ह्यांत माझें हित झाले, को- णते की द्रव्य खर्च केल्याने मिळावयाची नाहीं अशी जी अमूल्य वस्तू ह्मणजे तुझ्या कुटुंबाच्या परिचयाची व तुझ्या स्नेहाची वृद्धि ती म्यां मि. ळविली; मोठा बाग. विद्याधर ह्मणून कोणी गहस्थ होता. त्यास प्रपंचा- च्या निर्वाहासाठी वडिलोपार्जित स्वास्थ्य वतनवाडी वगैरे सांगावयाजोगते काही नव्हते; तरी तो थोड्या- मध्ये संतुष्ट राहून योग्य आचरणाने वागत असे. आ- पल्यापाशी जे काय आहे तितक्यांत संतुष्ट असावें, ही गुह्य गोष्ट त्याला ठाऊक होती, ह्मणून द्रव्यदारां मिळणारे जे द्रव्यवंताचे विलासाचे पदार्थ त्यांवांचून त्यास काळहरण करणे अवश्य होते. तथापि दुसऱ्याचे विलास पाहून ते आपणास नाहीत ह्मणून तो खेद किमपि मानीत नव्हता, आणि थोडक्यांत संतुष्ट राहून