पान:बाळमित्र भाग २.pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा बाग. आपल्या मुखांत किमपि अंतर पडू देत नव्हता. त्याला जन्मादारभ्य एकवेळ मात्र दुःख प्राप्त झाले होते, तें हेच की, त्याची सुशीळ पतिव्रता स्त्री मेली, पण त्या- समयी त्याचे अंत:करणाचे विसांव्यास एक नारायण नामें पुत्र राहिला होता. तो फार सुशील असे, तेणे करून त्याचे अंतःकरण तसेंच सुखी राहिले होतें. आपल्या स्थितीप्रमाणे पुत्रानेही मिळेल तेवढ्यांत संतुष्ट असावे, ह्याविषयींच्या विचाराकडे त्याने आपले मन योजिलें. नारायणही सद्गुणी, चतुर, व समंजस होता; हे त्याचे गुण पाहून संपत्तीच्या प्रत्येक पदार्था- मध्ये गुण असून दुर्गुण किती आहेत हे पुत्रास दाख- विण्याचा यत्न विद्याधराने मांडला. असा तो बाप अ. ल्पसंतोषाचे सुख आपण जातीने अनुभवून पुत्राचेही मनांत ठसवावें ह्याविषयींचा उद्योग करिता झाला. तो पुत्राचे कल्याणाची वांच्छा धरून मनांत ह्मणत असे की, स्वल्पांत देहाचा निर्वाह करून आनंदित अस- ल्याने श्रीमानापेक्षां ही सुखाचा लाभ अतिशीयत हो. तो. जो नमिळावयाचा पदार्थ त्यावर प्रीति व आशा ठेवणे हा केवळ मूर्खपणा होय. अशी बुद्धि जर पुत्रास मजकडून मिळेल तर इतरवस्तूं पेक्षां ती बुद्धि त्यास फार हितावह होईल, असे तो वारंवार चिंतन करीत असे. एके दिवशी विद्याधर नारायणास समागमें घेऊन एक फार रमणीय बाग होता तेथे गेला; असा बाग