पान:बाळमित्र भाग २.pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० बाळमित्र. नारायणाने कधीच पाहिला नव्हता. त्या बागांत नार- ळी, पोफळी, आंबे, अशोक, इत्यादि वृक्षांवी निबिङ छाया आहे; द्राक्षांचे मंडप, व जाई, जुई, चमेली, मोग- रा, गुलाब, शेवंती इत्यादि नाना प्रकारवीं फुल झाडे फुलली आहेत; पुष्पांचे परिमळाचा घमघमाट जिकडे तिकडे चालला आहे; जागी जागी कारंज्यांचे फवारे उडताहेत; हौदांतून कमळे फुलली आहेत; त्यांजवर अमर गुंजारव करिताहेत; मंदं शीतळ वायु झुळ झुळ वहात आहे; तेथील वागणारे मनुष्यांची मुखश्री मुप्रस- न्न होत आहे, असें तें अतिरमणीय स्थळ पाहून ना. रायणाचे अंत:करणास अतिआनंद झाला. एकदाच स- हस्रावधि रमणीय पदार्थ त्याचे दृष्टीत येतांच तो आ- श्वर्यात निमग्न झाला. आणि त्याची बुद्धि अगदी गुंग होऊन गेली. हे पाहून विद्याधराने पुत्राची चकभूल जावी ह्मणून तेथें एक बंगला होता त्या ठिकाणी त्या- स नेऊन भोजन घातलें. भोजन झाल्या नंतर नारा- यण आपल्या बापास ह्याप्रमाणे बोलं लागला. दादा, पाहिलेना तुझीं। इकडचे लोक कसे श्रीमत आहेत ते ? बागाचे दरवाज्यापाशी किती रथ उभे होते; आणि त्या लोकांचे आंगावर कसे भरजरी बादली पोषाक, व कंठी चौकडे वगैरे किती अलंकार होते. पहा, त्यांचे कसें भाग्य आहे ते, जें जें मनांत येईल ने ते घ्यावयास व करावयास ते समर्थ आहेत. असे आपणांस कां नाहीं बरें । ह्या लोकांपाशी रुपये फार