पान:बाळमित्र भाग २.pdf/१५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा बाग. आहेत तसे तुह्मांपाशीं कां नाहीत ? मी खरेंच सांगतों, आपण गरीब आहों में आतां माझे ध्यानात येऊ लागले, पाहिले असता ते तुह्मांपेक्षां सुरीतीने चाल- णारे नाहीत. मग असे होण्याचे कारण काय ? हे ऐकून विद्याधराने उत्तर दिले की, मुला, आह्मी गरीब आहों असी तुझी समजूत झाली काय ? तर आतां मी तुला सांगून ठेवितों की, आपण त्या लोकां- पेक्षा फार मातबर आहों. नारा०- तर मग तुह्मांपाशी इतका पैका आणि असा बाग कुठे आहे ? विद्या०- हा काय ? झापेक्षां मजजवळ पैका व बाग चांगला आहे. नारा०- काय ह्मणतां १ बाग तुह्मांपाशी आहे. तर मी कधी पाहिला नाहीं; दादा, तर तो मला दा- खवाना. विद्या- बरें, तुला एखादे दिवशी दाखवीन. नंतर एके दिवशीं विद्याधर पुत्रास, चल, तुला आ- पला बाग दाखवितों, असें ह्मणून, जेथून फार लांबवर देश दृष्टीस पडत होता अशा पर्वतावर त्यास घेऊन गेला. त्या पर्वताचे उजवे बाजूस एक फार मोठे रान आहे, ते असे की, त्याची हद्द काळे धारेशी लागलेली आहे; डावे बाजूस सुंदर मौजेचे हिरवेंचार कुरण आहे, व पिकांनी भरलेली शेते आहेत; पुढचे बाजूस फार मोठे मैदानांत पुष्कळ नद्यांचे प्रवाह वाहताहेत; जिकडे