पान:बाळमित्र भाग २.pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ बाळमित्र. पहावे तिकडे मनुष्ये आपआपल्या कामांत तत्परतेने लागली आहेत, कोणेक ठिकाणी कुणबी शेने कापिताहेत; कोणेक ठिकाणी कोळी नद्यांत मासे धरिताहेत, कोणेक ठिकाणी कितीएक लोक शस्त्रे घेऊन मृगयेसाठी धांवताहेत, मेंढरांचे कळप व गुरांची खिल्लारें जिकडे तिकडे चरताहेत, व छायेत ब. सताहेत, असें फार सुंदर स्थळ पाहन विद्याधर व ना. रायण ह्यांस अतिशयित आनंद झाला, त्यासमयी ना. रायणाने बापास प्रश्न केला. नारा०- दादा, तुमचा बाग अझन कोणीकडे आहे ? आपण तेथे केव्हां जाऊन पोहोचूं १ विद्या- मुला, हल्ली आपण आपल्या बागांतच आ- हो, हाच माझा बाग. नारा- काय ९ हाच बाग १ हा बाग नव्हे, हातर डोंगर आहे. विद्या०- भोवताली पहा, जेथपर्यंत तझी दृष्ट पोहचते तेथपर्यंत जे मळे, व शेते, करणे. व बाग बगाच आहेत ते सर्व माझे आहेत. नारा०- हे मी खरे समजणार नाहीं; उगीच तुझी माझी थट्टा करितां, दादा. विद्या०- नाहीं नाहीं, थहा नव्हे; मी खरेच सांगतो. तिं असे पहा की, मालकानें जें जें करावयाचे ते तें करावयाचा आधिकार मलाही आहे. मालका- प्रमाणे ह्यांपासून मलाही सुख मिळतें.