पान:बाळमित्र भाग २.pdf/१५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा बाग. १५३ नारा- ते कसे ते मला समजून सांगा. विद्या- बरें, हा सर्व मुलूख तुझाच जर असता तर तूं काय करतास १ नारा०- मी १ मालक आपले मालाचे जसें करितो नसे मीही करितो. विद्या-तें काय बरें नारा०- पहिल्याने तर ह्या रानांतली झाडी तोडून सर्पण पुष्कळ जमा करितो, मग हरणे धरावयास मृगयेस जातो, आणि बैल, गाई, मशी, इत्यादि जनावरें पुष्कळ बाळांगतो, शेतांचे दिवसांत शेतें कापून मुड्या घालून ठेवितो. विद्या- तूं ठीकच बोलतोस, नारायणा; तुझें मत आणि माझे मत एकच पडते; जसे तूं करीन ह्मण- तोस तसेच मी करीत आहे; ह्याविषयी पाहिजे तर तुझी खातरी करून देतो. नारा०- ती कशी करतां, दादा १ विद्या०- प्रथम मला जितकें सर्पण लागते तितकें हे लोक ह्या रानांतून तोडून आणून मला देतात. नारा०- बरें, तर, मी कधीच तुझाला ह्यालोकांस हु. कूम करतांना पाहिले नाही. विद्या- मला इतकी खटपट करणे नको, हुकमा. शिवाय ते आपाप माझे घरी आणून देतात. नारा०-लोक तुमचे घरी सर्पण आणून देतात हे खरे, पण तुह्मांला त्यांस पैसे द्यावे लागतात की नाही ?