पान:बाळमित्र भाग २.pdf/१६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ बाळमित्र. विद्या०- बरें, मी जर ह्या रानाचा खरा धनी असतों तर मला कांहींच खर्च न लागता की काय ? नारा०- मग कांहींच खर्च नको; लोक फुकट तुमचे घरी आणून पोहोचविते, त्यांस दमडी ही द्यावी लागतीना. विद्या०- तूं असें समजतोस काय ९ मला वाटते की, न्यास दुप्पट खर्च लागता. कसा तर. लांकडे तो- डावयास माणसे चाकरीस ठेविली पाहिजेत, त्यास कुन्हाडी वगैरे सामान दिले पाहिजे, ह्याला पैसे ख. र्चावे लागते की नलागते ? नारा०- बरे तर ही गोष्ट राहंद्या; पण तुझांला त्या रानांत मगयेस जाण्याचा अधिकार आहे काय? विद्या- मृगयेस स्वत: जाण्याचे काय कारण ! नारा०- हरणे धरून आणावयासाठी. विद्या-बरें, मला हरणे पाहिजेत तर मी पारध्यास सांगेन, त्याजकडे हरणे पुष्कळ असतात त्यांतून मला पारध केल्याशिवाय पाहिजेत तितकी मिळ- तील. त्यांत कदाचित् त्या रानांतली ही हरणे असतील. नारा.- पण त्यांस रुपये द्यावे लागतीलना ९ । विद्या- होय, पण पारध्यास दरमाहा द्यावा, आणि वाघरा, जाळी, फासे, घेऊन द्यावे, इतक्या खटपरी पेक्षां पैसा यकून घ्यावे ह्यांत फार सुख आहे. आम• चा शिकारखाना फार चांगला, सुंदर, बेताचा आहे.