पान:बाळमित्र भाग २.pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा बाग. १५५ स्वां पाहिलेंना, त्यालोकांच्या शिकारखान्याचा नाश ती हरणे व पांखरें कसा करिताहेत तें: आणि त्यामुळे त्यांस केवढा उपाधि आहे तो १ तसे काही मला आहे ? मी कसा आपला बिनघोर आहे बरें ? नारा०- आणि ह्या कुरणांत गाई, मशी, मेंढरे, चरत आहेत ही सर्व तुमचीच आहेत ? विद्या०- होय, माझीच आहेत; तुला में रोजरोज लोणकढें तूप, दूध, दही, लोणी मिळते ते कोठून ? ह्याच गाई मशींचें. नारा०- पण दादा, हे सर्व कळप, व खिलारें, व शेने भाते, नद्या, ही सर्व जर तुमची आहेत, तर मात- बर लोकांचे येथे जसे रोज नानाप्रकारचे भोज- नास पदार्थ असतात तसे तुमच्या येथे कां नाहीतर विद्या०- बरें, पण मानबर लोकांचे पात्रावर जितके पदार्थ असतात तितके सारे ते खातात की काय ? नारा०- असें नाही, त्यांतून जितके त्यांस रुचतात तितकेच ते खातात. विद्या- मी काही पावावर पदार्थ वाढल्यावर मग निवडा निवड करीत नाही, अगोदरच पाहून पा. हिजेत तितकेच शिजवितों, उगीच नासावयास अ- धिक शिजवीत नाही. तसे मजजवळ नाही खरें, पण जर फार पदार्थ करावे तर माजोन्या सारिखे यकावे कसे अधिक खावे तर पोट मोठे केलें पाहिजे, झणजे ठीक पडेल.