पान:बाळमित्र भाग २.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ बाळमित्र. नारा- पण दादा, मातबर लोक जसे नानाप्रकारचे उत्तम भोजन करितात, तसे काही तुह्मी करीत नसालसे वाटते. विद्या०- येवढें बरीक असमंजसपणे बोललास. मु. ला, ऐकिले, त्यांपेक्षा ही मी अतिशय करून उत्त- म भोजन करितो. श्रीमंतलोक तोंडास रुचि याव- यासाठी चटण्या कोशिंबिरी इत्यादि नानाप्रकारचे पदार्थ करितात, ती रुचि मजपाशी स्वतःसिद्ध आहे. नारा०- बरें, श्रीमंत लोकांपाशीं न्यांचे इच्छे पुरते द्र- व्य आहे, तसें तुह्मांजवळ कां नाही विद्या- त्यांपेक्षाही मजजवळ विशेषेकरून आहे, ते कसें ह्मणशील तर मला इच्छा नाही. नारा- पण, मला वाटते की, इच्छेची शांति करावी ह्यांत फार सुख आहे. विद्या०- नाहीं; इच्छेची शांतिकरण्यापेक्षा इच्छाच नहोऊ द्यावी ह्यासारखें मुख दुसरें नाही. नारा०- मला वाटते की ईश्वर मातबर लोकांस सोने रुपे फार देतो, तस्मात् त्याची कृपा तुजपेक्षा मातबर लोकांवर अधिक आहे. विद्या०- तुला आठवण नाही की, सोमवारचे दिवशी मी तुला जेवणांत जिलिबी वाढली होती, तिजवर तुझी भारी आवड बसली होती नारा०- होय दादा, तुमी मला ती एकच वाढली होती. विद्या०- तूं आणखी मागत होतास, पण दुरडीत पु.