पान:बाळमित्र भाग २.pdf/१६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा बाग. १५७ ष्कळ जिलिब्या असतां मी तुला वाढल्या नाहीत. ह्याचे कारण काय ते तुझ्या लक्षात आले नारा०- हेच कारण असेल की, फार खाल्ल्याने का दाचित् अजीर्ण होईल. विद्या- होय, हेंच, पण मी केलें तें ठीक केले की नाहीं नारा- ठीकच केलें, दादा. तुमची ममता मजवर भा. री आहे; मला आरोग्य होण्याविषयी तुझी तत्पर आहां हे मी पक्के जाणतों. ते दिवशी तुमचे मनांत असें आलें असेल की, ह्या जिलिब्या खातेवेळेस तर सास गोड लागतील पण पुढे ह्यांपासून कांहीं विकार होईल. असे नसते तर तुझी आणखी वा- ढावयास कांहीं नाबर नव्हता, हे मला समजनें. विद्या- देव मजपेक्षां तुजवर ममता कांही कमी क. रितो, असें तुला वाटते काय नारा.- नाही, तुहीं फारदां सांगितले की, गरिबापा- सून मातबरा पर्यंत देवाची कृपा सारखीच आहे. विद्या०- तर मग देवाला द्रव्य देण्यास कठीण काय आहे. नारा०- कांहीं कठीण नाहीं, जशी मी पायांखालची माती देण्यास समर्थ आहे, तसा तो द्रव्य देण्यास समर्थ आहे. विद्या- तूं ह्मणतोस की, देवाची कृपा मजवर आहे, १४