पान:बाळमित्र भाग २.pdf/१६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ बाळमित्र. व द्रव्य देण्याचे त्यास काही कठीण नाहीं; असे जर आहे तर तुला द्रव्य कां दिले नाहीं । ह्याव. रून काय समजावे. नारा०- जे मी द्रव्य इच्छितों तें नाशास कारण हो. विद्या- ह्या विषयी तुझी पक्की खातरी आहेना । नारा०- होय, पक्की आहे. आतां मी तुलां पुढे निरु- तर झालों तथापि, दादा,- विद्या- तथापि दादा कशाला, काय तुझे मनांत अ. सेल ते बोलसना नारा०- हा सर्व देश तुमचा हे काही माझ्या मनांत खरे भासत नाही. विद्या०- कां बरें, ह्याचे काय कारण नारा- तुझांला आपल्या इच्छे प्रमाणे ह्याचा उपभोग करतां येत नाही ह्मणून. विद्या- गांवांत एक मोठा नामांकित पुरुष जगत् शेट झणून आहे तो तुला ठावका आहे ? नारा०- होय, शहराचे भोवताले जे मोठे मोठे बाग आहेत ते त्याचेच नव्हत १ विद्या.- हो हो, ते सर्व त्याचेच आहेत. पण त्यास इच्छे प्रमाणे आपल्या सर्व बागांचा उपभोग घड. तो काय नारा.- नाही, दादा, नो बिचारा द्राक्षांचा एक दाणा- देखील त्यांतला खात नाही.