पान:बाळमित्र भाग २.pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० बाळमित्र. बसतों तो घोडा ह्या कुरणातल्या कापलेल्या गव. ताच्या पेंढ्या खात असेल. नारा.- पण मी तुमचे पागेत कधी घोडा पाहिला नाही. विद्या-ईश्वर कृपेनें मला इतका खर्च नाही. नारा- तर मग जेव्हां तुह्मांला घोड्यावर बसण्याची इच्छा होत असेल तेव्हां कांहीं बसणे घडत न. सेल. विद्या-छी, छी! तूं चकून बोलतोस, मी असा ख- बरदार आहे की, जेव्हां घोड्यावर बसल्याने आ- पले हित आहे असे वाटते तेव्हांच मात्र मी बसा. वयाची इच्छा करितों; आणि व्यासमयी एक दोन रुपयांचा खर्च भाड्यास करितों ह्मणजे पाहिजे त. सा घोडा मिळतो. तितका खर्च करण्या पुरते ईश्व. राने मला सामर्थ्य दिले आहे. नारा०- भाडे, ते काय ? त्यापेक्षा एक मोठा रथ अ. सावा, न्यास खासे मजेचे घोडे लावून त्यांत बसून विलास भोगावा, हे मला चांगले वाटते. विद्या- ते चांगलेच आहे, पण एक्या रथाचे मागे खटपट किती आहे बरें? तुटले मोडले नीट कराव- यास सुतार लोहार वगैरे ह्यांची नित्य गरज लाग- ती; आणि घोड्यांस जर काही आजार झाला, किवा गाडीवान हरि नसला, तर त्याचे काम बंद होते; ती दोनी यथास्थित असली तरच तो चालावयाचा,