पान:बाळमित्र भाग २.pdf/१६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा बाग. १६१ त्यांतही आणखी रथ उलटण्याचा धोका आहे. खाण्याची स्वस्थता असल्याने मनुष्य स्वस्थ बसते, व्यायाम घडत नाही, त्यामुळे प्रकृत बिघडी; म- णून मी तुला, नारायणा, खरेच सांगतों, मला पा- यी चालावयाचे पडतें ह्याचे मला काही एक वाईट वाटत नाही. बरें, आतां सूर्य अस्तास चालला, लौकर घरी गेले पाहिजे, नाही तर रात्र होईल, आंधार पडेल; पण माझा बाग पाहून तुला काही आनंद झाला ? नारा- दादा, तो तुमचा खरा बाग असता तर मला संतोष झाला असता. हे ऐकून विद्याधराने हास्य वदन केले, आणि उ. भयतां, पितापुत्र, घरी जावयाकरितां पर्वतावरून चा. लते झाले. त्यासमयीं असे झाले की, ते दोघे वाटेने जात असतां एक्या शेतांत जळबंब पाणी साचलेले, त्यांचे दृष्टीस पडले, तेव्हां हा तलावच आहे असे त्यां- स भासले. विद्या- अरे कर्मा ! ह्या अवघ्या शेतांत पाणी कसे भरलें आहे हे! नदीचा बांध फुटला काय : अरे- रे, ह्या सालचा तर दाणा अगदी बुडाला असें दि. सते. नारा०- शेताचे मालकास में वर्तमान समजले असतां त्यास फार दुःख होईल. विद्या- त्याचा केवळ इतकाच नाश झाला असें ना.