पान:बाळमित्र भाग २.pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा बाग. केले पाहिजे; कालचे रात्री एथें चोर आले होते, त्यांनी आंत जावयासाठी बागाची भिंत फोडून बं- गल्यांतील सरंजाम चोरून नेला. चोरी झाल्याची गोष्ट आज सकाळी समजली, ह्मणून बरे झालें, रात्रीच गूल झाली असती तर फार वाईट होते. विद्या०- कां ९ का १ असे का ह्मणतां १ गौडी- कारण की, चोरांनी बंगला जाळावयाची त- यारी करून ठेविली होती. त्यांचा मनसुबा असा होता की, आपण सांपडतों असें झाल्यास बंगल्या- ला आग लावून द्यावी, आणि त्या गडबडीत नि- घून जावे; परंतु ती आपली गुपचूप चोरी झाली ह्मणूनच बरे झाले. बागाचा धनी ह्मणत होता की, मी मोठा भाग्यवान; जर कदाचित मजकडून रात्री चोरांस उपद्रव लागला असता तर माझे डोळ्या देखत येवढी इमारत जळाली असती; आतां इतकें- च मात्र, भितीची दागदुजी केली, आणि काही नवा सरंजाम खरेदी केला ह्मणजे झालें. फारतर एक रामोशी चाकरीस ठेवावा लागेल. विद्या- (हे ऐकून मुकाट्याने अंमळ दूर जाऊन ह्मणतो.) नारायणा, हा इतका अनर्थ झालेला पाहून तुला दुःख वाटत नाहीं नारा०- मला हो कां तिन्हाईत ठिकाणी दुःख, माझें कांहीं नासले नाही. विद्या०- पण अशी नुकसानी जर तुझी झाली असती