पान:बाळमित्र भाग २.pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ बाळमित्र. तर १ जसे त्या बागाचे धन्याने आज सकाळी पा- हिले तसें त्वां पाहिले असते, ह्मणजे पाणचक्की वाहवली, व शेतांत पाणी शिरलें, व चोरी झाली, हे अनर्थ पाहिले असते तर तूं दुःखरहित अस- तास काय नारा.- शंभर वाट्यांनी अतिशयेंकरून दुःखांत बुडा. लों असतो. विद्या- अशी दु:खें तुला नित्य नित्य भोगावयाची जर प्राप्त होती तर आतां जसा तूं सुखी आहेस तसा तेव्हां असतास काय? नारा०- नाही, मी तर कधीही सुखी नसतो, केवळ दुःखसमुद्रात बुडून गेलो असतो. विद्या- तर, बाबा, नारायणा, असेंच आहे; ज्यां- पाशी संपत्ति फार आहे त्यांचे मागे असे अनर्थ नित्य आहेत, त्यांचे अंतःकरण सदा सर्वदा द्र. व्यांतच गुंडाळलेले असते; शेवटी द्रव्यच त्यांचे नाशास कारण होते. एखादे साली खरपड पडले, किंवा कांहीं एक योनलेली गोष्ट व्यर्थ झाली ह्म- णजे इतक्यानेच त्यांची नुकसानी होर्ता; मग त्या लोकांस असे वाटते की, खर्च कमी केला असतां आपली प्रतिष्ठा उणी पडेल, ह्याभयाने ते अधिक अधिक खर्च करितात. जों जो त्यांचे द्रव्यास खां- च पडत जाती तो तों ते अधिक खर्च करून आप. ण संपन्न आहों असें लोकांत सोंग आणितात.