पान:बाळमित्र भाग २.pdf/१७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा बाग. णे, व कनिष्ठ संपत्ति खालच्या भागाप्रमाणे आहे; पर्वताच्या मस्तकावर जसा वायूचा झपाटा फार त. सा अतिशयित संपत्तिवानास राजा चोर इत्यादिरूप वायूचा झपाटय भारी लागतो. पर्वताचा मध्यभाग जसा निर्वात असतो तशी मध्यम संपत्ति निरुपद्रव असते; पर्वताच्या खालच्या भागांत चिखल ओढे नाले असतात, ह्मणून तेथे चालणारास जसें पाऊ. ल कावयास कठीण पडते तसे कनिष्ठ संपत्तिवाना स हरएक मनांत आणलेली गोष्ट करावयास अव. घड पडती; ह्यासाठी जे वरल्या प्रदेशींचे संपत्तिवान लोक आहेत त्यांजकडे कधी कधी दृष्टि योजावी, पण कशा करितां ९ त्यांचे संपत्तीची ईर्षा करावया- साठी नव्हे, त्यां भोंवताला जो संकटाचा वेढा आहे तो आपणाला नाही ही ईश्वराने मोठी आप- णावर कृपा केली हे मनांत आणावयासाठी, आ- णि कधी कधी खालच्या प्रदेशी असणारे जे दरि- द्रीलोक त्यांजकडेही दृष्टि योजीत जावें, पण त्यांचे गरिबीचा उपहास करण्या करितां नव्हे, त्यांपेक्षा आपणास ईश्वराने मुखी ठेविलें आहे हे मनांत आणावयाकरितां असें अवश्य केले पाहिजे. हा जो मी तुला उपदेश केला हा दृढ मनांत धरून तसा वर्तत जा, आणि पुढे आपल्या पुत्रासही असें- च शिखवीतजा, ह्यांत हित फार आहे; असे बोलत बोलत ते पितापुत्र उभयतां घरी पोहोचले.