पान:बाळमित्र भाग २.pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. १६९ स्थल, रामरावाची खोली. अंक १. रामरावाचे खोलीत घडवंचीवर कागदाचे रुमाल आ- णि पोथ्या आहेत, आणि कोपऱ्यांत एक शिंग आहे. प्रवेश.. शिवराम आणि दुर्गा. शिव.- (बाप माडीवरून खाली उतरत आहे त्यास ह्मणतो.) बाबा, तुह्मी काही काळजी करूं नका, ह्या पोथ्या मी जपून फळीवर ठेवीन. (हर्षाने उड्या मारीत खोलीचे वाहेर येतो.) आतां आनी चांगला चांगला खेळ खेळू (मांजर गेल्या आंगणा, उंदी- र करिती दणाणा, अशी ह्मण आहे. ) (दुगो आं- त येती, तीस हणतो,) बरें दुर्गा, आई बाहेर गे- ली : आपली मित्र मंडळी आली आहे की नाही ? दुर्गा- माझ्या मैत्रिणी आल्या, पण अझून तुझे मित्र आले नाहीत. शिव-हे तर वाजवीच आहे; मुली जशा सर्वदा खेळावयास रिकाम्या, तसे मुलगे नसतात; त्यांस १५