पान:बाळमित्र भाग २.pdf/१७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ बाळमित्र. ध्या ठेवितो.) दुर्गा- हळूच ठेव भाऊराया; पोथ्या चोळवटतील बरें; आतां मी ह्या दत्फराचे खोलीत नेते अँ. मुलांपेक्षा मुलीच शहाण्या असतात असे सर्वलोकांस मान्य करणे प्राप्त आहे आतां. शिव०- होय, तशा मुलींमध्ये तूंच मुख्य आहेस वाटते १ ह्मणूनच घरांत तूं रोज रोज उलाढाल करतेस ती नीट करण्याकरितां मथुरेस खटपट करावी लागते. दुर्गा- तुझाही पंतोजी तुजकडे नित्य नित्य न पाहता तर तुझे कागद तुला सांपडते तें मी पाहते. असो, पण आतां अवघ्या पोथ्या झाल्याना : शिव- होय, चल आतां; येथे काही राहिले नाही, (ती बाहेर जाते. शिवराम खोलीतला केर काढून जागा स्वच्छ करितो.) वाहवा! खाशी मजेची जागा बनली; आतां येथे खूब मौज होईल. पण ते अझून का येत नाहींत कोण जाणे ब्वा मला मित्राचे घरी जावयाचे झाले तर मी कधी उशीर लावीत नसतो. दुर्गा- (मातक्याने आंत येते, आणि आसपास फिरू- न पाहते.) बरीच जागा झाली, पण भाउराया हे शिंग कोठे तरी दडवून ठेवबा, आतां तुझे मित्र येतील त्यांचे दृष्टीस हे पडले तर ते सारा दिवस वाजवून वाजवून कपाळ उठवितील.