पान:बाळमित्र भाग २.pdf/१८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपडाव. १७५ त्याला कळते. शिव- हे कशावरून ह्मणतोस तूं १ व.पा.- दोन तीन दिवस झाले, मी आणि माझा भाऊ दोघेजण बाहेर जावयास निघालों होनों; मी अंमळ कशालासा मागे राहिलों, माझा भाऊ माडीवरून खाली उतरत होता; तों, तो कोणी क- डून येऊन जिन्याजवळच्या खोलीत बसला हो- ना कोण जाणे; त्याने हळूच बाहेर निघून एका एकी माझे भावाचे पाठीत धपका मारिला, तेव्हां माझा भाऊ घाबरून पाय निसरून जिन्यांत पडला तो खालीच आला. शिव- त्याचा स्वभाव कसा आहे ह्याची परीक्षा मी न्याचे तोंडावरूनच केली असती; त्याचे येथे हे ये. णे प्रथमच आहे. तुमच्या मुलांत माझे मुलास ये- ऊ देत जा, ह्मणून त्याचे बापाने आमचे रावजी पाशी फारफार आग्रहकरून सांगितले. व.पा.- ही मोठी वाईट गोष्ट झाली. त्याचा माझा आतांशी अबोला आहे. शिव.- तुही ते एक्या बिहाडी राहतां, ह्मणून रावजीनी रुकार दिल्हा. तर तो आल्याने तुह्माला संतोष होईल की नाही व.पा.-संतोष ? संतोष पुसाल तर तो दहापांच को. स दूर असता तर बरे होते. तो आमच्या शेजा- री आल्यापासून आमाला एक क्षणभर ह्मणाल