पान:बाळमित्र भाग २.pdf/१८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७७ लपंडाव. णि तो तन्हेत-हेच्या रंगाचे मासे रस्त्यांत धरतो. शिव.- रस्त्यांत मासे धरतो झणजे १ व.पा.- होय जसे कोळी लोक गळ टाकून नदी- तले मासे धरतात तसा तो खिडकीत उभा राहून वाटेने जाणारे येणारे लोकांची पागोरी आंकडीने उचलून घेतो. कोणी गरीब गरीब त्याचे घराखाली गोष्टी सांगत उभे राहिले झणजे तात्याने लोकर लौकर माडीवर जाऊन एक चिंब्याची लांब आं- कडी घेऊन युक्तीनेच त्या गरिबाचें पागोटें वर उ- चलून घ्यावे. आणि आपण एक कुत्रे अगोदरच सिद्धकरून ठेवलेलेच असते त्याचे शेपटास त्या पागोट्याचे एक शेवट बांधून ते कुत्रे रस्त्यांत सो- डून द्यावे; त्या कुत्र्याने जिकडे जिकडे पळावें ति- कडे तिकडे त्याचे मागे पागोटें फरफटत जावें; मग न्या गरिबाने जेव्हां लांबवर मागें धांवावे तेव्हां; त्याचे हाती पागोटें लागावे. शिव.- पण हा काही खेळ नव्हे, ही तर शुद्ध लो- कांस पीडा द्यावयाची गोष्ट आहे. व०पा.- ह्याहीपेक्षा त्याचे दुसरें आचरण फार वाईट आहे; कुत्रे, मांजर, कोंबडे, बगैरे जे काय त्याचे हाती सांपडेल त्याचा पाय मोडल्यावांचून सोडाव- याचा नाही. एके दिवशी त्याने वाटेंत सरांटे टा- किले होते, तेव्हां त्याचाच कोणी आप्तविषयी ति. कडून आला, तंव ते त्याच्या पायांला मो.