पान:बाळमित्र भाग २.pdf/१८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० बाळमित्र. ख्यांकडे पाहून ) तुह्मांला मी संभाळतो. व.पा.- मजविषयी चिंता नको; तो माझी थट्टा क- रणार नाही; माझा तुसडा स्वभाव त्याला पक्का माहीत आहे, पण माझ्या भावाविषयी मात्र मला अंमळ काळजी आहे. भीमा- तो मऊ लागलें झणजे कोपराने खणतो आ• णि कठीण लागले झणजे नांव घेत नाही, अशी . त्याची चाल आहे. दुर्गा- खरेच आहे, पहा, मांजराच्या मागे कुत्रे लागले असतां जेव्हां का ते मांजर शेपूट पिंजारून त्याचे आंगावर फुसकारून धांवते, तेव्हां कुत्रे शेपूट पाडू- न पळून जाते. तसाच तो आहे.. शिव- दुर्गा, तूं मांजरा प्रमाणे चाल. दुर्गा- तूं नरसिंह अवतार धर. पण सर्वांनी आतां खाली बसावे हे मला बरे वाटते. तो मेला कारया अझून येत नाही, मग कशा करतां उगीच उभे राहावें १ शिव- अगे उगी, तो आला पहा. प्रवेश ४, तात्या, शिवराम, दुर्गा, मथुरा, आणि वडील पारखी. तात्या- (शिवरामास व दुर्गास पाहून नमतो. ) मी ।