पान:बाळमित्र भाग २.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८१ लपंडाव. तुमचा सेवक आहे, मजवर दया असावी; तुमचे रावजींनी मला तुह्मांमध्ये खेळावयाची आज्ञा दिली - आहे, ह्मणून मी आजचा दिवस तुह्मांमध्ये खेळेन. दुगा- मी घरधनीन आहे, ह्मणून तुला ह्या सर्व पाहु- ण्यांची वेगवेगळाली नांवें सांगितली पाहिजेत. हि- चें नांव कावेरीबाई. तात्या- अततत, हे नांव ऐकून मला फार आनंद - झाला. दुर्गा- आणि ह्याचे नांव- तात्या- आहा! याची माझी तर पक्की ओळख आहे, (भीमाकडे बोट दाखवून.) हिचे नाव काय बरे असेल ९ हिचें नांव साडेभावार्थी बाई असेल. ही फार भोळी दिसते. हिला लोकांस वांकोल्या दाख. वितां फार चांगल्या येतात. ( मग खोलीत लंगड- शाई घालीत घालीत मनीकडे बोट दाखवून ह्मण- तो.) हा तर लंगडशहा बादशहा; ही माराचे भया- ने पळता पळतां पडली, आणि पाय मोडला ह्मणू- न ही रोज रोज लंगडशाई खेळती. ( वडील पार- ख्याकडे बोट दाखवून ह्मणतो,) हे तर मोठे दो- वाचार्य, आह्मां गरिबांकडे पाहत देखील नाहीत. ( धाकट्या पारख्याकडे बोट दाखवितो,) ह्याचे नांव तर उघडच आहे; ह्याचे आईने ह्याची लहा- नपणी जीभ चांगली ओढली नाही, हाणून हा