पान:बाळमित्र भाग २.pdf/१८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. पाहून नमतो.) दुसऱ्याचे गुण बाहेर काढण्याचे तुझें काम तें मी घेतलें, ह्मणून रागें भरूं नको, क्ष. मा कर, आतां आपण गडी धरूं. (तिचा हात धरितो.) दुर्गा- ( तान्यास हात धरूं देते.) बरें पण- तात्या- (अकस्मात् धाकट्या पारख्याकडे फिरून त्यास कुचेष्टेनें ह्मणतो, ) तूं चांगला पोर दिसतोस ह्मणून तुला भेटावेसे वाटते, थांब, (धाकटा पारखी त्यास भेटावयास भितो, तात्या त्यास बळात्काराने ओढितो, तेव्हां तो मूल रडू लागतो.) शिव.- सोड, सोड त्याला, नाही तर- तात्या- नाही तर काय करशील, माझ्या लहान- ग्या छबड्या १pany शिव०- मी लहान आहे खरा, परंतु माझ्या मित्रास सहाय होण्यापुते सामर्थ्य माझे आंगी आहे बरें! हे मी तुला अगोदर सांगून ठेवतो. तात्या- तर मी ही तुह्मांमध्ये तुमचा मित्र होण्यास येणार. त्यास पाहूं बरें अगोदर, तूं आपले मित्राचें साह्य कसे करतोस ते. (तो लागलाच धाकटे पा. रख्याचे अंगावर चालून जाऊन त्यास बिलगतो. शिवराम न्यास पाडतो आणि आपण त्याचे उरावर बसतो. इतर मुले त्यांस सोडवायास धांवतात.) शिव०- बायांनो, अंमळ कृपा करा आणि दूर व्हा; मी काही झाला मारीत नाही. कांतात्याजी, आ.